जिल्ह्यात आजपर्यंत ६८२४ करोना बाधित
सार्वमत

जिल्ह्यात आजपर्यंत ६८२४ करोना बाधित

आज २१५ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २१६० इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २१५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४५८० इतकी झाली.

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये १६ रुग्ण बाधित आढळून आले बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये

श्रीरामपुर ०२

मनपा ०४- मुकुंदनगर ०१, भोसले आखाडा ०१, सावेडी नाका ०१, पदमा नगर ०१.

कॅन्टोन्मेंट - ०३

राहुरी ०२- सोनगाव ०१, राहुरी शहर ०१

नगर ग्रामीण ०२ - जेऊर ०२

कर्जत - ०१,

श्रीगोंदा - ०१

नेवासा - ०१ रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १२३, संगमनेर २२, राहाता १०, पाथर्डी ४, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट १, नेवासा ५, श्रीगोंदा ३, पारनेर २, अकोले ११, राहुरी १, शेवगाव १, कोपरगाव १, कर्जत ३ रुग्णाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com