संगमनेरात करोनाचा 14 वा बळी
सार्वमत

संगमनेरात करोनाचा 14 वा बळी

कासारवाडी येथील 63 वर्षीय इसमाचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू

Nilesh Jadhav

संगमनेर | प्रतिनिधी | Sangmner

तालुक्यात करोना विषाणूने कहर केला असून आज पहाटे कासारवाडी येथील 63 वर्षीय इसमाचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला. या घटनेने संगमनेर तालुक्यातील करोना बळींची संख्या 14 वर जावून पोहचली आहे.

संगमनेर शहरात 8, धांदरफळ 1, निमोण 2, कौठेकमळेश्वर 1, डिग्रस 1 तर काल कासारादुमाला येथील एक 63 वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या 14 झाली आहे.

कासारादुमाला येथे करोनाने बळी गेलेली व्यक्ती ही दुधाचा व्यवसाय करीत होती. सदर व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यावर त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र त्यानंतरही त्यांना त्रास जाणवत असल्याने तेथेच ठेवण्यात आले होते. पुन्हा सदर व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला. तो अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मात्र त्यांची परिस्थिती गंभीर होत गेली. अखेर काल सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या वृत्ताला जिल्हा आरोग्य यंत्रणेचे नोडल अधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com