Corona
Corona
सार्वमत

जिल्हयात ६४ नवे करोना बाधित

एकूण रुग्ण संख्या ३१३२ वर

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हयात शनिवार सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येत ६४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ११३६ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या ३१३२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ६४ जण बाधित आढळून आले. यामध्ये नगर शहरातील २, संगमनेर मधील (पदमा नगर ४, बाजारपेठ २, जनता नगर २, जेढे कॉलनी ३, संगमनेर ३, विद्यानगर २, बडोदा बँक ३, राजापूर २, कोंची १, पिंपळगाव देपा १, सुकेवाडी ३, शिबलापूर १, गणेशनगर ३, कुरण १, मुटकुळे हॉस्पिटल १, खंडोबा गल्ली २, गुंजाळवाडी १, जवळे कडलग १), कर्जत येथील (राशीन ४, मिरजगाव ३, कर्जत २, पिंपळवाडी १), राहाता येथील (शिर्डी १०, नांदुरखी १, गोगलगाव १,), राहुरी येथील (राहुरी बु. १, येवले आखाडा १, वांबोरी १, कात्रड १) रुग्णांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com