नगरमधील ६१ वर्षीय महिला पॉझिटिव्ह

आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Corona
Corona

अहमदनगर ( प्रतिनिधी ) - नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला.

आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये नगर मनपा ०९, नगर ग्रामीण ०४, संगमनेर आणि पारनेर प्रत्येकी ०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ४०० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाडे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com