संगमनेर शहर मलनिस्सारणसाठी 61 कोटी, 22 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेस मान्यता

संगमनेर शहर मलनिस्सारणसाठी 61 कोटी, 
22 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेस मान्यता

संगमनेर (प्रतिनिधी) -

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांततर्गत संगमनेर शहराच्या मलनिस्सारण (टप्पा-1) प्रकल्पास आणि पाणी पुरवठा प्रकल्पास

काही अटींवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेची मंजूर किंमत 22 कोटी 79 लाख रूपये आहे. त्यात राज्य शासनामार्फत 85 टक्के म्हणजे 19 कोटी 37 हजार रूपये देण्यात येणार आहे. तर संगमनेर पालिकेस 15 टक्के म्हणजे 3 कोटी 42 लाख रूपये खर्च करावे लागणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत संगमनेर शहराच्या मलनिस्सारण (टप्पा-1)प्रकल्पास काही अटींवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही योजना 61 कोटी 10 हजारांची आहे. या योजनेमुळे संगमनेर शहरात सांडपाणी आणि मलनिस्सारणची व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे करण्यात येणार आहे. या दोन्हीही योजनांच्या मंजुरीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या मंजूरीमुळे या दोन्ही योजनांच्या कामांना गती येणार आहे.

या प्रकल्पाचे कार्यान्वयन संगमनेर नगरपरिषदेमार्फत करणेत यावे.सदर प्रकल्पासाठी शासन निर्णय दिनांक 04 जून, 2018 अन्वये विहित केल्यानुसार जास्तीतजास्त 3 टक्केच्या मर्यादेत शुल्क प्रदान करण्याच्या अधीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती नगर परिषदेने एक महिन्यात करावी. त्याबाबत आवश्यक ठराव नगरपरिषदेने करावा.

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क संबंधित सल्लागारास स्वनिधीतून प्रदान करणे नगर परिषदेवर बंधनकारक राहील. त्याबाबत आवश्यक ठराव नगरपरिषदेने एक महिन्यात करावा. सदर प्रकल्पास मान्यता देताना राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने विहित केलेल्या सर्व अटींची पूर्तता करणे कार्यान्वयन यंत्रणेवर बंधनकारक राहील.

प्रकल्प मंजूरीच्या पहिल्या वर्षात नगरपरिषदेने त्यांच्या कामकाजाचे पूर्ण संगणकीकरण करणे अनिवार्य राहील. यात प्रामुख्याने ई-गव्हर्नन्स, लेखा, जन्म मृत्यू नोंद सुधारणा याची 100 टक्के अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com