शासकीय कामाच्या नावाखाली 60 हजाराची फसवणुक

तोफखाना पोलिसांत गुन्हा; लातुरच्या एकाविरूध्द गुन्हा
Fraud (फसवणुक)
Fraud (फसवणुक)

अहमदनगर (प्रतिनिधी)

फॅशन डिझाईन कोर्सेसचे शासकीय काम देतो, असे सांगून व्यावसायिकाची 60 हजार रूपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शत्रुघ्न धानु पवार (रा. बाभळगाव, जि. लातुर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. देवेंद्र सुभाष गोयल (वय 44 रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे येथील एका खासगी रूग्णालयात कज्युल्टी ऑफीसर म्हणून मेडीकल प्रॅक्टीस करतात. तसेच त्यांचे गाडेकर चौक येथे कृष्णा नावाचे फॅशन डिझाईन कोर्सेस सेंटर आहे.

सदर कोर्सेस सेंटरवर त्यांची पत्नी गायत्री ही कोर्सेस घेण्याचे काम पाहते. सन 2019 मध्ये फिर्यादी यांची शत्रुघ्न पवार याच्याशी शासकीय योजनेच्या कामकाजादरम्यान ओळख झाली होती. शत्रुघ्न पवार हा देखील फॅशन डिझायनिंग कोर्सेस काम करत होता. सन 2020 मध्ये पवार याने फिर्यादी यांना फॅशन डिझाईन कोर्सेस शासकीय काम देतो, असे सांगीतले. परंतु तुम्हाला मला 60 हजार रूपये द्यावे लागतील असे म्हणाला.

त्यामुळे फिर्यादी यांनी 3 जानेवारी, 2020 रोजी आरटीजीएसने 10 हजार व त्यानंतर उर्वरीत रक्कम 24 जानेवारी, 2020 रोजी आरटीजीएस मार्फत 50 हजार रूपये पवार याच्या बँक खात्यावर पाठवले. त्यानंतरही शत्रुध्न पवार याने फिर्यादी यांचे काम करून दिले नाही. फिर्यादी यांनी डिसेंबर 2020 मध्ये शत्रुघ्न पवार याच्याकडे पैसे परत मागीतले परंतु शत्रुघ्न पवार याने मला पैसे परत दिले नाहीत. गुरूवार, 17 नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com