अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन आता जवळपास सव्वा महिन्यांचा कालावधी झाला आहे. याचसोबत शहरासह ग्रामीण भागात

करोनाचा संसर्ग नियंत्रणात असून हळूहळे शाळा भरण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात सध्या 47 हजार 912 विद्यार्थी येत असून 68 हजार 698 पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत नगर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्याची आणि विद्यार्थ्यांची स्थिती चांगली असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात नववी ते बारावी 1 हजार 209 शाळा असून त्यात 2 लाख 84 हजार 354 विद्यार्थी आहेत. राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर पहिल्या आठवड्यात केवळ 278 शाळा सुरू झाल्या होत्या. त्यातील विद्यार्थ्यांची उपस्थितीही केवळ साडेपाच हजारांपर्यंत होती. त्यानंतर दुसर्या आठवड्यात ही संख्या काहिशी वाढली. तर तिसर्या आठवड्यात 515 शाळा सुरू झाल्या आहेत. आता साधारणपणे सव्वा महिन्यांनंतर जिल्ह्यात 725 शाळा सुरू झाल्या असून माध्यमिक शिक्षण विभागाच्या आकडेवारीनूसार तिसर्या आठवड्याच्या आकडेवारीनुसार 2 लाख 85 हजार विद्यार्थ्यांपैकी अवघे 47 हजार 912 विद्यार्थी शाळेत हजर राहिले असून ही संख्या वाढण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे आतापर्यंत 68 हजार 698 पालकांनी संमती पत्रभरून दिले असून ती संख्याही कमी आहे. एवढ्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले असले तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती ही संमतीपत्राच्या तुलनेत 20 हजारांनी कमी आहे. यामुळे पालक अद्याप विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे धाडस करत नसल्याचे दिसत आहे.

161 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची संख्या 16 हजार 877 आहे. त्यातील 15 हजार 476 जणांची कोरोना चाचणी झाली असून उर्वरित सुमारे 1 हजार शिक्षक आणि शिक्षेकेतर यांची चाचणी बाबी आहे. यात 161 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

असे आहे चित्र

नववी ते बारावी एकूण शाळा- 1209

सुरू झालेल्या शाळा- 725

एकूण विद्याथी- 2 लाख 84 हजार 354

उपस्थित विद्यार्थी - 47 हजार 912

एकूण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी - 16 हजार 877

पॉझिटिव्ह कर्मचारी -161

तालुकानिहाय विद्यार्थी

अकोले 7 हजार 921, जामखेड 2 हजरी 190, कर्जत 4 हजार 123, कोपरगाव 523, मनपा 1 हजार 13, नगर 3 हजार 957, नेवासा 1 हजार 785, पारनेर 3 हजार , पाथर्डी 2 हजार 211 215, राहाता 5 हजार 430, राहुरी 5 हजार 267, संगमनेर 5 हजार 141, शेवगाव 1 हजार 206, श्रीगोंदा 3 हजार 195, श्रीरामपूर 925 असे आहे.