नगरमध्ये रिक्षात आढळले 57 लाखाचे सोने

पोलिसांकडून सोने जप्त; एकाला अटक
नगरमध्ये रिक्षात आढळले 57 लाखाचे सोने

अहमदनगर|Ahmedagar

शहरामध्ये संशयास्पद फिरणार्‍या रिक्षाची पोलिसांनी झडती घेतली असता यामध्ये 56 लाख 89 हजार 690 रूपये किंमतीचे 1 किलो 368 ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले. पोलिसांनी ते सोने जप्त केले असून फैरोज रफीक पठाण (रा. बाबा बंगाली, नगर) याला अटक केली आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, ही सोन्याची बॅग पठाण याला गंजबाजार परिसरात सापडली असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पठाण विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलिसांचे पथक बाबा बंगाली परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद रिक्षा दिसून आली. या रिक्षा चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी रिक्षा चालकाला पकडले. त्याचे नाव विचारले असता त्याने फैरोज पठाण असे सांगितले. रिक्षाची झडती घेतली असता रिक्षामध्ये 1 किलो 368 ग्रॅम सोने असलेली बॅग मिळून आली. या सोन्या विषयी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने पोलिसांना ठोस पुरावे दिले नाही. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com