53 महसूल मंडलात दमदार पाऊस

संगमनेरात 100 तर राहात्यात 87 मिलीमीटर पावसाची नोंद
53 महसूल मंडलात दमदार पाऊस
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात सोमवारी रात्री ते मंगळवार पहाटे अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील 97 महसूल मंडला (Revenue Circle) 53 मंडलात 20 मिलीमीटर ते 100 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. काल जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा संगमनेर मंडलात (Sangamner Circle) 100 मि.मी,. तर राहाता मंडलात (Rahata Circle) 87 मि.मी., पाऊस झाला असून जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरीच्या 137 मिली मीटर नोंद झालेली आहे.

जिल्ह्यात सोमवारी रात्री उशीरा 11 नंतर अचानक आकाशात विजांच्या लखलखाटात जोरदार पावसाच्या सरी कोसळ्या. यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस (Rain) झाला असून या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होतांना दिसत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन (Soybeans), कापूस (Cotton) यासह अन्य पिके सध्या पाण्यात आहेत. दिवसाआड दररोज रात्री पाऊस पडत असल्याने आधी खरीप हंगामातील पिकांची पेरणीसह (Sowing of kharif crops) रब्बी हंगामासाठी वापसा कधी होणार याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे सध्या दररोज दिवसभर कडाक्याचे उन पडत असून रात्रीच्यावेळी पावसाचा तडाखा बसत आहे.

सोमवारी झालेल्या 20 मि.मी. पेक्षा अधिक महसूल मंडलनिहाय पाऊस पुढील प्रमाणे- नालेगाव 28.3, नागापूर 28.5, जेऊर 26.5, वाळकी 20 (नगर). भाळवणी 22.8, निघोज 20.5, पळशी 57.5 (पारनेर). श्रीगोंदा 40.3, काष्टी 21.8, मांडवगण 55.5, पेडगाव 31.5, कोळगाव 53.5 (श्रीगोंदा). राशीन 53.3, कोंभळी 20, मिरजगाव 40., माहिजळगाव 59.8 (कर्जत), अरणगाव 53, खर्डा 44.8, नायगाव 31.3 (जामखेड). नेवासा बु.26.8, नेवासा खु. 28.5, चांदा 24.8, घोडेगाव 29.3, सोनई 20.8, वडाळा 41.3 (नेवासा). सातरळ 33.3, ताराबाद 53, देवळाली 42.8, टाकळीमियॉ 27.5, वांबोरी 31.3 (राहुरी), संगमरनेर 100, धांदरफळ 30.2, आश्वी 32, तळेगाव 33.8, शिबलापूर 32.8, समनापूर 33.5, डोळसने 48.8, साकूर 41.3, पिंपळणे 37.3 (संगमनेर). वीरगाव 33, समशेरपूर 37.8 (अकोले). कोपरगाव 27.8, दहिगाव 38.3, पोहेगाव 27 (कोपरगाव). श्रीरामपूर 38.3, बेलापूर 40, उंदिरगाव 38.5, टाकळीभान 46 (श्रीरामपूर). राहाता 87.3, शिर्डी 50.5, लोणी 35.5, बाभळेश्वर 72 आणि पुणतांबा 66.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

Related Stories

No stories found.