जिल्हयात ५४ नवे करोना बाधित आढळले
Corona

जिल्हयात ५४ नवे करोना बाधित आढळले

१३२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले आहे. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५४० इतकी झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२० इतकी झाली आहे.

आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर १० (मार्केट यार्ड ०३, नालेगाव ०१, केडगाव ०१, भिस्तबाग चौक ०१, सूडके मळा ०१, रेल्वे स्टेशन ०१, रंगार गल्ली ०१, बागड पट्टी ०१), श्रीरामपूर ०४ (शहर ०२, बेलापूर ०१, शिरसगाव ०१), कर्जत ०२ (शहर ०१, माही जळगाव ०१), अकोले ०४ (शहर ०३, लहीत ०१), जामखेड ०२ (सोनेगाव ०१, साकत ०१),नगर ग्रामीण ०३ (निंबलक ०१, घोस्पुरी ०१, निमगाव घाना ०१), पाथर्डी ०१, शेवगाव १० (शहर ०५, मुंगी ०५), नेवासा ०३ (सोनई), पारनेर ०९ (लोणी मावळा ०३, पिंपळगाव रोठा ०२, कर्जुले हर्या ०१, कुंभार वाडी ०१, वडनेर बुद्रुक ०१, खडक वाडी ०१), संगमनेर ०६ (गुंजाळ वाडी ०३, कुरण ०३) अशा रुग्णाचा समावेश आहे. एकूण रुग्ण संख्या १४९३ झाल्याची माहिती नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com