
वीरगाव l वार्ताहर
अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्प अर्ध्यापेक्षा अधिक भरल्याने लवकरच ओव्हरफ्लो होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत
पाणलोटातील मुसळधार पावसामुळे 2 हजार 200 क्युसेक्सच्या दरम्यान जोरदार पाणीआवक नदीपात्रातून सुरु असल्याची माहिती कालवा निरीक्षक मयुर देशमुख यांनी दिली.
1060 लदघफू.पाणीसाठा क्षमतेच्या आढळा मध्यमप्रकल्पाचा सोमवारी सायंकाळी 6 वा. 590 दलघफू झाला.सांगवी-पाडोशी लघुप्रकल्प त्याचप्रमाणे नदीपात्रातील छोटे-मोठे बंधारे भरुन पाण्याचा जोरदार प्रवाह आढळा पात्रात सुरु आहे.
पाण्याची जोरदार आवक असल्याने आज मंगळवारी धरणाचा पाणीसाठा 60 टक्केपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.