बेलापुरात 50 बेडचे कोविड केअर केंद्र सुरू होणार

बेलापुरात 50 बेडचे कोविड केअर केंद्र सुरू होणार
file photo

बेलापूर (वार्ताहर) -

जनता आघाडी,कर्मयोगी मुरलीधर खटोड पतसंस्था,संस्कृती मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच साई खेमानंद मेडिकल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बेलापुरात 50 बेडचे कोविड केअर केंद्र सुरू होत आहे.


बेलापूर येथील जनता आघाडी,कर्मयोगी मुरलीधर खटोड पतसंस्था,संस्कृती मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच साई खेमानंद मेडिकल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने गुरुवारी दि.22 पासून संस्कृती मंगल कार्यालयात कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसणार्‍या रुग्णांसाठी कोविड केअर केंद्र सुरू होत आहे.

यामध्ये 50 रुग्णांना दाखल करण्याची सोय करण्यात आली आहे. येथे दाखल होणार्‍या रुग्णांवर डॉ.रामेश्‍वर राशीनकर, डॉ शैलेश पवार उपचार करणार आहेत.येथे रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती रविंद्र खटोड,भरत साळुंके,रत्नेश राठी,डॉ चेतन लोखंडे यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com