पुणतांबा ग्रामीण आरोग्य केंद्राला 5 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशिन देणार : आ. काळे

पुणतांबा ग्रामीण आरोग्य केंद्राला 5 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशिन देणार : आ. काळे

कोपरगाव (प्रतिनिधी) - पुणतांबा व मतदार संघातील राहाता तालुक्यातील इतर गावातील करोना बाधित रुग्णांना उपचार घेताना अडचणी निर्माण होऊ नये यासाठी गरज पडल्यास 10 ऑक्सिजन बेडची सुविधा करून देणार असल्याची ग्वाही देऊन पुणतांबा प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच 5 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन देणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

करोनाच्या संभाव्य तीसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी पुणतांबा प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून रुग्णांना देण्यात येणार्‍या सोयी सुविधांची केलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांचे मालक व त्यांचे कर्मचारी यांची कोविड तपासणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तपासणीचा वेग वाढवा. करोना संसर्ग वाढणार नाही यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घ्यावा.

नागरिकांचे प्रबोधन करून बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्यासाठी करोना समितीच्या सदस्यांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा आजार अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून आपल्या कुटुंबाचे आरोग्य आबाधित ठेवावे असे आवाहन केले. याप्रसंगी माजी सरपंच अ‍ॅड. मुरलीधर थोरात, शांतिलाल भाटी, अरुण बाबरे, संजय धनवटे, सचिन धोर्डे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन गायकवाड, डॉ. मुर्तडक, ग्रामविकास अधिकारी कडलग आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com