5 नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या - ना. काळे

5 नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या - ना. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातील नागरिकांना लवकरात लवकर नियमित स्वच्छ पाणी मिळावे यासाठी 5 नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या, अशा सूचना श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

131.24 कोटी रुपये निधीतून करण्यात येणार्‍या साठवण तलाव क्र. 5 च्या पावसाळ्यानंतर सुरू करण्यात आलेल्या कामाची नुकतीच ना. आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांकडून त्यांनी कामाची माहिती घेतली. यावेळी ना. म्हणाले की, 5 नंबर साठवण तलावासाठी मंजूर करून आणलेल्या 131.24 कोटी निधीतील समावेश असलेल्या इतर कामांना प्रारंभ करण्यात आला आहे.

मात्र कामाला गती कमी आहे. त्यामुळे साठवण तलावाच्या पुढील कामाला देखील गती देण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकर्‍यांनी जातीने लक्ष द्यावे. अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करा मात्र लवकरात लवकर मुदतीच्या आत 5 नं. साठवण तलावाचे काम पूर्ण कसे होईल यासाठी सामूहिक प्रयत्न करून साठवण तलावाच्या कामाला गती द्या, अशा सूचना ना. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगरपरिषद अभियंता सुनील ताजणे, मानवसेवा कन्स्ट्रक्शनचे विवेक पाटील, पाटबंधारे विभागाचे मिसाळ, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे महेश मुंगेरीया, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, शहर कार्याध्यक्ष संतोष चवंडके, काळे कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, अजीज शेख, फकीर कुरेशी, दिनकर खरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, धनंजय कहार, वाल्मिक लहिरे, चांदभाई पठाण, सचिन गवारे, राजेंद्र आभाळे, महेश उदावंत, किरण बागुल, विलास पाटोळे, विजय शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com