उपसभापती रविंद्र भापकर यांच्या शेष निधीतून आगडगाव देवस्थानसाठी ५ लक्ष रुपये

उपसभापती रविंद्र भापकर यांच्या शेष निधीतून आगडगाव देवस्थानसाठी ५ लक्ष रुपये

अहमदनगर | प्रतिनिधी

नगर तालुका पंचायत समितिचे उपसभापती रविंद्र भापकर ( Nagar Taluka Panchayat Samiti Deputy Chairman Ravindra Bhapkar) यांच्या शेष निधीतुन आगडगाव (ता.नगर) देवस्थान (Agadgaon Devasthan) येथे शौचालय (Toilet) व इतर आरोग्यविषयक कामासाठी ५ लक्ष (5 Lakh) रुपये देण्यात आले.

उपसभापती रविंद्र भापकर यांच्या शेष निधीतून आगडगाव देवस्थानसाठी ५ लक्ष रुपये
हभप बंडातात्या कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोलेत आंदोलन

या कामाचा शुंभारभ जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके (ZP Vice President Pratap Shelke) याच्या हस्ते नुकताच पार पडला. भापकर यांनी नगर तालुक्यात (Nagar Taluka) एक वर्ष म्हणुन उपसभापती म्हणून कार्य करताना तालुक्यातील अनेक गावात भरीव निधी दिला आहे. आगडगाव (Agadgaon) गेल्या चार ते पाच वर्षात भैरवनाथांचे जागृत देवस्थान म्हणून जिल्ह्यात नावारुपास येत आहे आणि त्यासाठी निधी देण्याचा निर्णय भापकर यांनी घेतला आहे.

उपसभापती रविंद्र भापकर यांच्या शेष निधीतून आगडगाव देवस्थानसाठी ५ लक्ष रुपये
शिक्षकांचे एक दिवसीय आंदोलन

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे (Sharad Zodge), गोविंद मोकाटे (Govind Mokate), संदेशजी कार्ले (Sandesh Karle), बाळासाहेब हराळ (Balasaheb Haral), रामदास भोर (Ramdas Bhor), प्रविण कोकाटे (Pravin Kokate),शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत (Shivsena Rajendra Bhagat), आगडगावचे सरपंच मच्छीन्द्र कराळे (Agadgaon Sarpanch Machhindra Karale), उपसरपंच संतोष शिरसाठ (Santosh Shirsath), ग्रामसेवक पोपट गावडे (Gramsevak Popat Gawde), देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे (Balbhim Karale), साहेबराव गायकवाड (Sahebrao Gaikwad), नितीन कराळे (Nitin Karale), प्रल्हाद खाडे (Pralhad Khade), दिपक गुगळे (Dipak Gugle), बाबासाहेब बोरुडे (Babasaheb Borude), दिलीप गायकवाड (Dilip Gaikwad), संभाजी कराळे (Sambhaji Karale), भाऊसाहेब पालवे (Bhausaheb Palwe) आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना देवस्थान साठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. देवस्थानसाठी भविष्यात मोठा निधी उपलब्ध करून देऊ, आगडगाव जिल्ह्यात मोठा नावलौकिक मिळवत आहे आणि आपण सर्वजण त्यासाठी कटीबद्ध राहू असेही शेळके म्हणाले. उपस्थित सर्वांनी रविंद्र भापकर यांच्या कामाचे भरभरुन कौतुक केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com