...अखेर 45 रुग्णवाहिकांना लागला मुहूर्त

जिल्हा परिषद : महाराष्ट्र दिनी पालकमंत्री करणार हस्तांतरण
...अखेर 45 रुग्णवाहिकांना लागला
मुहूर्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या अनेेक महिन्यांपासून रखडलेला जिल्हा परिषेदच्या रुग्णवाहिकांचा विषय मार्गी लागत आहे. या रुग्णवाहिकांचा फायदा ग्रामीण भागात करोना रुग्णांच्या सेवेसाठी होणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पालकमंत्री हसन मुश्रीफ या रुग्णवाहिकांचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करणार आहेत.

सध्या करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात 98 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 55 उपकेंद्र आहेत. या ठिकाणी करोना रुग्णांची तपासणी होते. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना पुढील उपचारास नेण्यासाठी रुग्णवाहिकांची गरज भासते. सध्या 64 प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका आहेत.

इतर केंद्रांसाठी रुग्णवाहिका नसल्याने ग्रामविकास विभागाने नगर जिल्ह्यासाठी 45 रुग्णवाहिका दिल्या. त्याची तरतूद चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून केली आहे. शनिवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com