नेवाशात 43 तर सोनईत 26 संक्रमित

नेवाशात 43 तर सोनईत 26 संक्रमित

नेवासा (प्रतिनिधी)-

नेवासा शहरात काल एकाच दिवसात विक्रमी 43 तर सोनईत 26 संक्रमित आढळून आले. तालुक्यातील 55 गावांतून 195 करोना संक्रमित आढळून आले.

नेवासा व सोनईत संक्रमितांची संख्या या महिन्यात झपाट्याने वाढली आहे. सोनईत आता जनता कर्फ्यू सुरु झाला आहे. नेवासा शहरातील बाधितांची संख्या वाढतीच आहे.

काल घोडेगाव येथे 7 संक्रमित आढळून आले. पानसवाडी व खरवंडी येथे प्रत्येकी 6 बाधित आढळले. भेंडा बुद्रुक व माळीचिंचोरा येथे प्रत्येकी पाच बाधित आढळले. पाचेगाव, शिंगणापूर, सौंदाळा, जळके खुर्द व जैनपूर या पाच गावातून प्रत्येकी चौघे बाधित आढळले.

बेलपिंपळगाव, अमळनेर, भालगाव, कुकाणा, शिरेगाव, गोगलगाव, गोयगव्हाण व रांजणगाव या 8 गावात प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

तरवडी, निपानीनिमगाव, नारायणवाडी, लोहगाव, मांडेगव्हाण, करजगाव, वरखेड, गेवराई, वाकडी, वडाळा बहिरोबा, उस्थळदुमाला, सलाबतपूर, रस्तापूर, गळनिंब, मुकिंदपूर, लांडेवाडी, भेंडा बुद्रुक व आंतरवाली या 18 गावांतून प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

बेलपांढरी, धामोरी, देवगाव, धनगरवाडी, देवसडे, घोगरगाव, मंगळापूर, प्रवरासंगम, शिरसगाव, सुरेगाव, गोपाळपूर, खेडलेपरमानंद, माका, म्हसले, निंभारी, पिचडगाव व पिंपरीशहाली या 17 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. अशाप्रकारे वरील 55 गावांतून 195 संक्रमित आढळून आले असून त्यामुळे तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 7 हजार 645 झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com