जिल्हयात २४ तासात ४२८ रूग्णांची नव्याने भर

रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ६९ टक्के
जिल्हयात २४ तासात ४२८ रूग्णांची नव्याने भर

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत करोना रुग्ण संख्येत 428 ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅबमध्ये 54, अँटीजेन चाचणीत 126 आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 248 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 604 इतकी झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत करोनामुक्त झालेल्याची संख्या 2 हजार 949 इतकी झाली. जिल्हात करोनातून बरे होण्याचे प्रमाण 69.80 टक्के एवढे आहे.

जिल्हा रुग्णालयातील करोना प्रयोगशाळेतून दुपारी बारा वाजता आलेल्या अहवालांत 40 नवे करोना रुग्ण वाढले. यात श्रीगोंदा शहर 1,काष्टी 2, जंगलेवाडी 3 असे 6 रुग्ण, नगर शहरातील पोलीस हेड कॉर्टर 1, कवडे नगर 1, सावेडी रोड 1, सारसनगर 1, नगर 2,केडगाव 1, माळीवाडा 1, शिवाजीनगर 1,रेल्वे स्टेशन 1 असे 10 रुग्ण. नगर ग्रामीणमध्ये बुर्‍हाणनगर 1, नवनागापूर 1 असे 2 रुग्ण. जामखेड जालुक्यात दिगाव 1, भिंगारमधील मोमीन गल्ली 1, कँटोन्मेंट हॉस्पिटल कॉर्टर 1, नेहरू कॉलनी 1 असे 3 रुग्ण. पाथर्डी शहर 1, नेवासा तालुक्यात अंतरवली 1, कुकाणा 3, जळका 1 असे 5 रुग्ण.

राहाता शिर्डी 1, संगमनेर तालुक्यात ओझर खुर्द 3, निमोण 1, रायतेवाडी 7 अशा 11 रुग्णांचा यात समावेश होता. त्यानंतर या रुग्ण संख्येत आणखी 14 रुग्णांची भर पडली. यामध्ये संगमनेर निमोण 5, जोर्वे 1 असे 6 रुग्ण. श्रीगोंदा पिंपळगाव पिसा 1 रुग्ण, नगर ग्रामीण चास 1 रुग्ण, नगर शहरातील सारसनगर 3 रुग्ण. पाथर्डी शहर 1 आणि पागोरी पिंपळगाव 1 असे 2 रुग्ण. नेवासा तालुक्यातील तारवाडी 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत गुरूवारी तब्बल 126 जण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर 22, राहाता 1, पाथर्डी 22, नगर ग्रामीण 16, श्रीरामपूर 25, कँटोन्मेंट 6, नेवासा 16 आणि कर्जत 18 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 248 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 186, कर्जत 2, राहुरी 4, अकोले 1, श्रीगोंदा 2, नेवासा 2, श्रीरामपूर 3, नगर ग्रामीण 9, पाथर्डी 7, राहाता 12, संगमनेर 7, पारनेर 7, शेवगाव 3 आणि जामखेड येथील 3 रुग्णाचा समावेश आहे.

झेडपी व पंचायत समितीत पॉझिटिव्ह

तळमजल्यावरील एका विभागातील कर्मचारी तर नगर पंचायत समितील एक विस्तार अधिकारी कृषी करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यामुळे पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे पुढील काही दिवस या ठिकाणी गर्दी टाळून कर्मचार्‍यांना घरून काम करण्याच्या विचारात प्रशासन आहे.

228 घरी सोडले

दरम्यान, गुरूवारी 228 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात मनपा 114, संगमनेर 12, राहाता 26, पाथर्डी 3, नगर ग्रामीण 25, श्रीरामपूर 1, कॅन्टोन्मेंट 10, नेवासा 2, पारनेर 8, राहुरी 10, शेवगाव 1, कोपरगाव 3, श्रीगोंदा 2, कर्जत 3, अकोले येथील 02 रुग्णांना तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आलेले आणि आता बरे झालेल्या 06 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले.

* बरे झालेली रुग्ण संख्या 2949

* उपचार सुरू असलेले रुग्ण 1604

* मृत्यू 60

* एकूण रुग्ण संख्या 4613

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com