रेल्वे अपघातात ४० मेंढ्या ठार
सार्वमत

रेल्वे अपघातात ४० मेंढ्या ठार

श्रीरामपुर जवळील यशवंत बाबा चौकी येथील घटना

Nilesh Jadhav

रांजणखोल | वार्ताहर | Ranjankhol

वाकड़ी- श्रीरामपुर रस्त्यावरील असलेल्या रेल्वेच्या यशवंतबाबा चौकी येथिल भुयारी मार्गा जवळ रेल्वे रुळ ओलांडत असतांना रेल्वे इंजीनची जोरदार धडक बसुन ४० मेंढ्या मृत झाल्याची घटना घङली आहे.

मागील काही दिवसापूर्वी ही अशीच घटना घङली होती. या भुयारी पुलाखाली सुमारे चार ते पाच फुट उंचीवर पावसाचे पाणी साचल्याने ५० मेंढ्याचा मालक असलेल्या मेंढपाळने ही जनावरे रेल्वे रस्ता ओलंडण्यासाठी रेल्वे रुळ वरुण नेत असताना विणा डब्बे असलेले भरधाव इंजिनने जोराची धड़क देत पुढे गेले. यात ४० मेंढ्या मृत झाल्या. ही घटना काल सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमरास घडली. जर या ठिकाणच्या भुयारी मार्गात पाणी नसते तर त्याच मेंढ्या रुळावरुण न जाता भुयारी मार्गातून गेल्या असत्या व त्यांचे प्राण वाचले असते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com