पशूधन खरेदीसाठी 4 कोटींचा निधी

सभापती सुनील गडाख : तीन योजनांचा समावेश
पशूधन खरेदीसाठी 4 कोटींचा निधी

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वेगवेगळ्या योजनांमधून पशूधन खरेदीसाठी 4 कोटी 10 लाख 50 हजार रुपयांचा निधी पंचायत समिती पातळीवर वर्ग करण्यात आला आहेत. याबाबतची माहिती जिल्हा परिषद पशूसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी शुक्रवारी पशूसंवर्धन समितीच्या मासिक बैठकीत दिली.

जिल्हा परिषद पशूसंवर्धन समितीच्यावतीने विशेष घटक योजनेत 2 कोटी 96 लाखांचा देण्यात आला असून यात दुधाळ जनावरांचे गट वाटपासाठी 1 कोटी 41 लाख रुपये आहेत. यातून 221 शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार आहे. यासह शेळ्यांचे गट वाटपासाठी 45 लाखांची तरतूद असून यातून 84 शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार आहे. यासह पशूखाद्य वाटप योजनेतून 404 शेतकर्‍यांसाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

आदिवासी उपाय योजनेत दुधाळ जनावरांचे गट वाटपासाठी 12 लाखांची तरतूद असून यातून 18 शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार आहे. शेेळ्या मेंढ्या गट वाटपासाठी 9 लाख रुपये असून यातून 86 शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार आहे. तर एक दिवसीय कुक्कट पिलांचे गट वाटपासाठी 50 लाख रुपयांची तरतूद असून त्यातून 625 शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार आहे. पशूखाद्य वाटपासाठी 2 लाख 50 हजारांची तरतूद असून त्यातून 101 शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार आहे.

आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी यांच्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटपासाठी 12 लाखांची तरतूद असून यातून 18 शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार आहे. शेेळ्या मेंढ्या गट वाटपासाठी 9 लाख रुपये असून यातून 16 शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार आहे. तर एक दिवसीय कुक्कट पिलांचे गट वाटपासाठी 10 लाख रुपयांची तरतूद असून त्यातून 125 शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार आहे. पशूखाद्य वाटपासाठी 10 लाख तरतूद असून त्यातून 404 शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेत दोन दुभत्या जनावरांच्या गट वाटप योजनेत (75 टक्के अनुदान) शेळी-मेंढ्या गट वाटपात 10 शेळ्या आणि 1 बोकड, 100 दिवसांच्या पिलांचा गटासाठी 50 टक्के अनुदान आणि लाभार्थ्यांकडील दुभ्या जनावरांना गाभण काळात 150 किलो पूश खाद्य पुरविण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. वैरवण विकास योजनेत मका बियाण्यात अफ्रिकन टॉल व अ‍ॅडव्हांटा ही दोन प्रकारची बियाणे तसेच शुगरग्रेज व बाजार नंबर 1 हे बियाणे शेतकर्‍यांना पुरवठा करण्यात येत असल्याचे सभापती गडाख यांनी सांगितले. पूशसंवर्धन समितीच्या बैठकीला सदस्य संध्या आठरे, सोनाली रोहमारे, शांताबाई खैरे, दिनशे बर्डे, वंदना लोखंडे, उर्मिला राऊत, राजश्रीताई मोरे, रावसाहेब कांगुणे, सुनिता बर्डे, तसेच जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. अरूण हरिचंद्र उपस्थित होते.

जिल्ह्यात लाळ्या खुरत रोगाचे येत्या 30 दिवसात लसीकरण पूर्ण करण्याच्या सुचना पशूधन विकास अधिकारी यांना देण्यात आल्या असून लसीकरण झालेल्या जनावरांचे टॉगिंग करण्यात येणार आहे. तसेच सर्व साखर कारखान्यांचे चेअरमन यांना उस वाहतुकीसाठी येणार्‍या जिल्ह्यातील आणि बाहेरील जिल्ह्यातील जनावारांचे लसीकरण आणिं टाँगिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com