जबरी चोरीतील 4 आरोपींना अटक
सार्वमत

जबरी चोरीतील 4 आरोपींना अटक

नेवासा पोलिसांची कामगिरी

sukhdev fulari

sukhdev fulari

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील वाशिम येथुन गंगापुरकडे जात असताना वाशिम शिवार ता.नेवासा येथे दोन अनोळखी इसमानी गाडी खाली पाडुन मला लाकडी काठीने डोक्यास ,हाताला गंभीर दुखापत करुन मायक्रोफिन प्रा.लि.फायनान्स कंपनीच्या

प्रतिनिधींच्या ताब्यातील बॅगेतील रोख रक्‍कम 1 लाख 82 हजार रुपये लुटणाऱ्या आरोपींना नेवासा पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्या कडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 503/20202 भा द वि कलम 394 नुसार दि.3 ऑगस्ट रोजी दाखल असलेल्या फिर्यादीत फिर्यादी राजेंद्र वासुदेव खंडारे (वय 34 वर्षे) धंदा- नोकरी ता.गंगापुर जि.औरंगाबाद यांनी म्हंटले होते की, दि.3 रोजी रोजी दुपारी 3:22 वा.चे सुमारास मी नोकरी करत असलेले स्वतंत्र मायक्रोफिन प्रा.लि.फायनान्स कंपनी शाखा गंगापुर ता.गंगापुर जि.औरंगाबाद या कंपनीचे कर्ज वसुल करुन मी माझे मोटार सायकल वरुन वाशिम ता.नेवासा येथुन गंगापुरकडे जात असताना वाशिम शिवार ता.नेवासा येथे दोन अनोळखी इसमांनी माझे गाडी खाली पाडुन मला लाकडी काठीने डोक्यास ,हाताला गंभीर दुखापत करुन माझे ताब्यातील बॅगेतील रोख रक्‍कम रुपये 1 लाख 82 हजार व इतर साहित्य बॅगेसह बळजबरीने हिसकावुन चोरुन नेले.

सदर गुन्ह्याचे तपास पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग,अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे , उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांचे सुचने प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, पोहेकॉ कैलास साळवे, पोना राहुल यादव, पो ना सुहास गायकवाड, पोकॉ भागवत शिंदे, पोकां गणेश इथापे या पथकाने सदर गुन्हयात गेला माल व अज्ञात आरोपीचा सखोल व बारकाईने तपास करुन गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढुन सदर गुन्हयात आरोपी राहुल एकनाथ उदमले (वय19) रा. कानडगाव ता. गंगापुर जि. औरंगाबाद, विशाल रामभाऊ पवार (वय-20) वर्षे रा. सिध्दीवाडी ता.गंगापुर जि.औरंगाबाद, अमित उत्तम तनपुरे (वय 26)रा.भालगाव ता.नेवासा,जि.अहमदनगर, अकिल शकिल शेख (वय 24 वर्षे) रा.भालगाव ता.नेवासा जि.अहमदनगर यांना अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेला मालापैकी 1 लाख 2 हजार 700 रुपये हस्तगत करण्यात केला असुन गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

गुन्हयाचा पुढिल तपास नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ हे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com