
तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पोलाद स्टील कंपनीच्यावतीने आयोजित तारांगण या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी थ्रीडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकाशगंगेची सफर केली.
भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रा. लि. माध्यमातून सामाजिक कार्याची भावना जोपासत तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पोलाद स्टील कंपनीच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांना ‘थ्रीडी’ आकाशगंगेची सफर अनुभव आणि स्वतः अवकाशात असल्याची आभासी अनुभूती मिळाली. पोलाद स्टील कंपनी आणि साई मेटल्स, संगमनेर यांच्यावतीने तारांगण उपक्रमातून थ्रीडी आकाशगंगेची सफर अनुभवताना विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी आकाशगंगा, खगोलीय वस्तू त्याचबरोबर सूर्यमालेतील ग्रहांचा अभ्यास व त्याची माहिती घेतली.
आपण स्वतः अवकाशात असल्याची आभासी अनुभूती मिळाली, असे विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले. तसेच अशाप्रकारे अभ्यास करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पोलाद स्टीलचे संचालक सतीश अग्रवाल, संचालक नितिन काबरा, असिस्टंट व्हा. प्रेसिडेंट आशिष भाबडा, विभागीय व्यवस्थापक सुशांत गव्हाणे, विपणन अधिकारी अजय कुलकर्णी, साई मेटल्सचे संचालक दत्तात्रय जोंधळे, यशवंत कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तारांगण उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनोखा अनुभव घेतला.
यानिमित्ताने पोलाद स्टीलचे विभागीय व्यवस्थापक सुशांत गव्हाणे, विपणन अधिकारी अजय कुलकर्णी यांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. प्रसंगी प्राचार्य एच. आर. दिघे, उपमुख्याध्यापक संजय दिघे, पर्यवेक्षक बी. सी. दिघे सहित शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.