नगर - जिल्हयात आज ३९ करोना बधित

जिल्हयातील एकूण रुग्णांची संख्या १३६१
नगर - जिल्हयात आज ३९ करोना बधित

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले तर काल रात्री उशीरा १८ जणांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले. यामुळे जिल्हयात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही ५३४ इतकी झाली आहे. दरम्यान, आज सकाळी २२ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्जार्च देण्यात आला. जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ७९४ इतकी झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

आज सकाळी आलेल्या अहवालानुसार, पारनेर तालुक्यातील ०३ (साबळेवाडी ०१, नांदूरपठार ०१ आणि पळसपूर ०१). भिंगार येथील १०, नगर ग्रामीण मधील ०३ (वाकोडी ०१, डोंगरगण ०१), श्रीगोंदा तालुक्यातील ०५ (कोळगाव ०३, लोणी व्यंकनाथ ०२) रुग्णांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले.

दरम्यान, काल रात्री १८ जणांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले. यामध्ये संगमनेर १२ (कुरण ०२, राजापूर ०१, बागवानपुरा ०४, घुलेवाडी ०१, सय्यदबाबा चौक ३, सुकेवाडी ०१), नगर शहर ०५, आणि अकोले ०१ (कळंब) असे बाधित रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या १३६१ इतकी झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३ रुग्ण दगावले आहेत तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ७९४ इतकी झाली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com