करोना अपडेट
करोना अपडेट
सार्वमत

करोना रुग्णांमध्ये 379 ची भर

संगमनेर 51, राहाता 23, अकोले 13, कोपरगाव 11, नेवाशात 9 बाधीत

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 379 इतक्या रुग्णांची वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 109, अँटीजेन चाचणीत 5 जण बाधित आढळून आले. तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 265 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 451 इतकी झाली आहे. तर करोनावर मात केल्याने घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 945 झाली आहे.

रात्री उशिरा प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार संगमनेर तालुक्यात 51, राहाता तालुक्यात 23, अकोलेत 13, कोपरगाव 11 तर नेवाशात 9 व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये रविवारी सकाळी 64 करोना बाधित आढळून आले होते. त्यात नगर 2, संगमनेर 36, कर्जत 10, राहाता 12, राहुरी 4 यांचा समावेश होता. नगर शहरातील दोघांमध्ये 1 शहरातील तर दुसरा फकिरवाडा, संगमनेरमधील पदमानगर 4, बाजारपेठ 2, जनता नगर 2, जेढे कॉलनी 3, संगमनेर 3, विद्यानगर 2, बडोदा बँक 3 , राजापूर 2, कोंची 1 , पिंपळगाव देपा 1, सुकेवाडी 3 , शिबलापूर 1, गणेशनगर 3, कुरण 1, मुटकुळे हॉस्पिटल 1, खंडोबा गल्ली 2, गुंजाळवाडी 1 , जवळे कडलग 1 अशा 36 रुग्णांचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील राशीन 4, मिरजगाव 3, कर्जत 2, पिंपळवाडी 1 अशा 10 रुग्णांचा समावेश असून राहाता तालुक्यातील शिर्डी 10, नांदुर्खी 1, गोगलगाव 1 या 12 रुग्णांचा, राहुरी तालुक्यात राहुरी बु. 1, येवले आखाडा 1, वांबोरी 1 आणि कात्रड 1 या चार रुग्णांचा समावेश आहे.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणखी 45 बाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये, कर्जत तालुक्यातील राशीन 3, थेरवाडी 1 असे 4. नगर शहरातील गुलमोहर रोड 1 आणि अन्य 1. राहाता तालुक्यातील वाकडी 1 , गणेशनगर 3, साकुरी 1 असे 5 रुग्ण, श्रीगोंदा तालुक्यात बनपिंप्री 1, काष्टी 2 असे 3 रुग्ण. श्रीरामपूर रेल्वे कॉलनी 1, शहर 4 असे 5 रुग्ण. संगमनेर अशोक चौक 1, पदमानगर 3, घुलेवाडी 7, सुकेवाडी 1, धांदरफळ 1, उमरी 1, निमोण 1 असे 15 रुग्ण. अकोले 2, वरुडी पठार 1, वाघापूर कोतूळ 1 असे 2 रुग्ण. नेवासा तालुका जळका 1, भेंडा बु.1, गळनिंब 2,करजगाव 5 अशा 9 रुग्णांचा यात समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल श्रीरामपूर येथील 5 जण बाधित आढळले. यासह खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 265 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 224, कर्जत 03, नगर ग्रामीण 9, नेवासा 1, पारनेर 6, पाथर्डी 1, राहाता 6, राहुरी 5, शेवगाव 1, श्रीगोंदा 3 आणि श्रीरामपूर 5 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात रविवारी तब्बल 465 करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 945 झाली आहे. जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता दोन हजारांच्या टप्प्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शनिवारी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांनुसार यापुढे करोना रुग्णांचे सौम्य- अती सौम्य, मध्यम आणि अन्य गंभीर आजारासंह करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण असे वर्गीकरण करून उपचार करण्यात येणार आहेत. तसेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यासाठी नव्या पध्दतीचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात सात दिवसांनंतर सौम्य आणि अती सौम्य तसेच मध्यम स्वरूपाची लक्षणे असणार्‍या रुग्णांना सलग तीन दिवस श्वसनचा त्रास आणि ताप नसल्यास त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. मात्र, या रुग्णांना होम क्वारंटाईनची सक्ती राहणार आहे. तर अन्य गंभीर आजारांसह करोना असणार्‍या रुग्णांवर उपचार सुरू ठेवण्यात येणार आहेत. रविवारी घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये नगर मनपा 279, संगमनेर 33, राहाता 29, पाथर्डी 4, नगर ग्रामीण 15, श्रीरामपूर 24, भिंगार कॅन्टोन्मेंट 3, नेवासा 15, श्रीगोंदा 17, पारनेर 12, अकोले 6, राहुरी 11, शेवगाव 8, कोपरगाव 3, जामखेड 1 आणि कर्जत 5 यांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com