मतदारसंघात 36 नवे तलाठी कार्यालय उभारणार - आ. कानडे

मतदारसंघात 36 नवे तलाठी कार्यालय उभारणार - आ. कानडे
आ. कानडे

भोकर (वार्ताहर) / Bhokar - राज्यात करोनामुळे सर्वत्र अडचणी आहेत. सर्वजण त्यावर मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली विकास साधायचा आहे. येत्या एक वर्षात श्रीरामपूर मतदार संघातील 36 नवी कार्यालये होणार असून नव्याने तलाठी कार्यालय इमारती उभारण्यात येणार असल्याची माहिती आ. लहु कानडे (MLA Lahu Kanade) यांनी दिली.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर-घुमनदेव रस्ता, भोकर अडबंगनाथ रस्ता तसेच दिघी रस्ता, उंबरगाव, कारेगाव, मुठेवाडगाव, ब्राम्हणगाव व खैरी निमगाव ते जाफ्राबाद रस्ता, मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष करण ससाणे होते तर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्‍वर मुरकुटे, बाबासाहेब दिघे, ज्येष्ठ नेते इंद्रभान थोरात, पंचायत समिती सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे, कार्लस साठे, सतीश बोर्डे, सुरेश पवार, अशोक कानडे, राजेंद्र कोकणे, आबा पवार, आकाश पवार, अ‍ॅड. समीन बागवान, आकाश क्षीरसागर, हरिभाऊ बनसोडे, राजेंद्र औताडे, रमेश आव्हाड आदी प्रमुख उपस्थित होते.

मतदार संघातील दळणवळणास प्राधान्य देत 192 कोटीचा निधी आणला. करोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने येथे आणखी बेडची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर येथे आता 25 बेड बालकांसाठी असणार आहे. ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून ग्रामीण रुग्णालयाजवळ दोन कोटीचा ऑक्सीजन प्लँट उभारणी सुरू आहे त्यामुळे तेथील रुग्णांसाठी बाहेरून ऑक्सीजन आणावा लागणार नाही. मतदार संघात अद्याप अनेक कामे करायची आहेत, त्यातून मतदार संघाचा विकास साधायचा असल्याचे यावेळी आ. कानडे यांनी सांगितले.

यावेळी करण ससाणे, सचिन गुजर, व डॉ. वंदनाताई मुरकुटे आदींची भाषणे झाली, यावेळी कृषीमित्र सोपान पटारे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुदाम पटारे व गणेश छल्लारे यांनी केले.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सागर शिंदे, भिकाजी पोखरकर, रामदास शिंदे, दिलीप पटारे, नारायण पटारे, एकनाथ लोखंडे, गंगाराम गायकवाड, भाऊसाहेब भोईटे, किशोर मते, भाऊसाहेब पटारे, बाबासाहेब तागड, विठ्ठल आहेर, याकोब अमोलिक आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com