नगरमध्ये 35 हजार एलईडी पथदिवे बसविणार - महापौर बाबासाहेब वाकळे

नगरमध्ये 35 हजार एलईडी पथदिवे बसविणार - महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर (प्रतिनिधी) - खासगी ठेकेदारामार्फत कचरा संकलनाचा प्रयोग सक्सेस झाल्यानंतर आता नगर शहरात एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहे. खासगी ठेकेदारामार्फत 35 हजार दिवे बसविले जाणार आहेत. सावेडीच्या कुष्ठधाम रोडवर त्याची सुरूवात झाल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

खासगी ठेकेदारामार्फत 35 हजार एलईडी पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला असून दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या दोन्ही ठेकेदारांना प्रायोजिक तत्वावर कुष्ठधाम रोडवर एलईडी पथदिवे बसविण्याची मुदत दिली होती, ती पूर्ण झाली असून लवकरच एजन्सीचा अहवाल आल्यानंतर शहरामध्ये एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेला एलईडी पथदिव्याचा प्रकल्प शहरामध्ये साकारण्यात येणार असून या माध्यमातून मनपाची आर्थिक बचत होणार आहे. तसेच संपूर्ण शहर एलईडी दिव्यांनी प्रकाशमय होणार आहे. दोघांपैंकी जी निविदा योग्य आहे त्यास कार्यारंभ आदेश देण्यात यावा असे आदेश महापौर वाकळे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

विद्युत विभाग प्रमुख आर.जी.महेत्रे म्हणाले, शहरामध्ये एलईडी पथदिवे बसविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या दोन ठेकेदरांना प्रायोजिक तत्वावर पथदिवे बसविण्यासाठी मुदत दिली होती. दोन्ही ठेकेदाराने कुष्ठधाम रोडवर एलईडी पथदिवे बसविले असून अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

कुष्ठधाम रोडवर ई स्मार्ट एनर्जी सोल्युशन प्रा.लि. कंपनीच्यावतीने प्रायोजिक तत्वावर एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरूवात महापौर बाबासाहेब वाकळे व विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर यांनी पाहणी केली. यावेळी विद्युत विभागाचे प्रमुख आर.जी.मेहेत्रे, श्री.रावसाहेब चव्हाण, गणेश बारस्कर, पुष्कर कुलकर्णी, शुभम वाकळे उपस्थित होते.

इशारा देताच काम

शहरात पथदिवे बसवावेत यासाठी मनपा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल घेत विद्युत विभागाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. ठेकेदारांमधील वाद न्यायालयीन प्रक्रीयेत गेला असून तो मिटून लवकरच एजन्सी निश्‍चित केली जाईल. घनकचर्‍याप्रमाणेच विद्युत विभागाचा कार्यभार खाजगी ठेकेदारामार्फत करून घेतला जाईल. त्यातून महापालिकेची आर्थिक आणि विजेची बचतही होईल, असे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com