नगरच्या रस्त्यांसाठी हवे ३५० कोटी

युवा सेनेची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
नगरच्या रस्त्यांसाठी हवे ३५० कोटी

अहमदनगर | प्रतिनिधी

नगर शहरातील रस्त्याची परिस्थिती सुधारविण्यासाठी युवा सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे ३५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली.

शहरातील रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडविणे खूपच अत्यावश्यक आहे. यासाठी नगर शहरातील शिवसेनेच्यावतीने माजी नगरसेवक विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे सोबत होते. नगर शहरातील रस्त्याची कामे निधी अभावी रखडलेली असून त्यासाठी ३५० कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे या मागणीबाबत अनुकूल असल्याचा दावा राठोड यांनी केला.

नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. स्व. आ. अनिल भैय्या राठोड यांची जनतेशी घट्ट पकड होती. त्यांच्या विचार आणि कार्यावर आधारित काम करून नगर शहर शिवसेनेतील युवा सदस्यांची पक्ष वाढीस चालना द्यावी, अशी सूचना ठाकरे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.