नगर - जिल्हयात ३४४४ रुग्णांवर उपचार सुरू

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.२२ टक्के
नगर - जिल्हयात ३४४४ रुग्णांवर उपचार सुरू

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज ९०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान,

जिल्हयात आज वाढले १३५ रूग्ण...

काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४४४ इतकी झाली आहे.

...या तालुक्यातील रुग्णांचा समावेश

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५५, संगमनेर ०१, राहता ०३, पाथर्डी २१, नगर ग्रामीण ०५, श्रीरामपूर ०७, कॅंटोन्मेंट ०९, नेवासा ०३, पारनेर ०५, राहुरी ०२, शेवगाव ०१, कोपरगाव ०१, जामखेड ०२, मिलिटरी हॉस्पिटल १७, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज ९०९ रूग्ण करोना मुक्त

दरम्यान, आज ९०९ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा ३२२, संगमनेर ७१, राहाता ५९, पाथर्डी २१, नगर ग्रा.९५, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट १३, नेवासा ५५, श्रीगोंदा ३२, पारनेर २०, अकोले ३७, राहुरी ४३, शेवगाव १४, कोपरगाव २६, जामखेड १७, कर्जत १३, मिलिटरी हॉस्पिटल १० आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com