अहमदनगर (प्रतिनिधी) -

सावेडी उपनगराच्या एकविरा चौकातील बस स्थानकाच्या पाठीमागे आडोशाल सुरू असलेल्या कल्याण मटका, सोरट जुगारावर शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे

यांच्या पथकाने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, सोरट जुगार साहित्य असा 34 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ताब्यात घेतले अशोक सुखदेव देवकाते (वय 27 रा. पाईपलाईन हाडको, सावेडी), अर्जुन सुरेश जंगम (वय 32 रा. पवननगर, सावेडी), गंगाराम तात्याबा पवार (वय 38 रा. गजराजनगर, सावेडी) यांच्याविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकविरा चौकातील बस स्थानकाच्या पाठीमागे आडोशाल जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीवरून उपअधीक्षक ढुमे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी बाबासाहेब फसले, सचिन जाधव, बाबासाहेब मासाळकर, राजेंद्र जायभाय यांच्या पथकाने जुगारावर छापा टाकला. यावेळी तीन जुगार्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपअधीक्षक ढुमे यांच्या पथकाने ही कारवाई केली.