संगमनेरातील ३१ गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र; 'या' गावांचा समावेश

संगमनेरातील ३१ गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र; 'या' गावांचा समावेश

संगमनेर (प्रतिनिधी)

तालुक्यातील ३१ गावांमध्ये करोना बाधितांची संख्या दिवस गणीक वाढत असल्याने ही गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत, अशी माहिती इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

करोनाचे संकट अद्यापही दूर होताना दिसत नाही, दिवसागणिक करोनाचे रुग्ण आढळत असल्याने हे संकट अजून किती काळ राहील हे हे स्पष्ट होत नाही. जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक करोना संक्रमीत आढळून येत आहे. करोना विषयी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. उपाय योजनाही केल्या जात आहे. मात्र करोना काही हटत नाही. नुकताच गणेशोत्सव साजरा झाला. या काळातही मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी गर्दी दिसून आली. संगमनेर तालुक्यातून करोना हद्दपार व्हावा यासाठीचे प्रयत्न होत असताना आता शहरासह ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळेच तालुक्यातील ३१ गावांमध्ये प्रशासनाला प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करावे लागले.

तालुक्यात आत्तापर्यंत ३२ हजार ३२९ करोना बाधित आढळून आले आहेत. पैकी ३१ हजार ३४७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८७९ रुग्ण करोना संक्रमीत आहेत. तर काल १५७ रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.

तालुक्यातील खळी, पिंप्री लौकी अजमपूर, जाखुरी, पानोडी येथील हजारवाडी, राजवाडा, टेकेवाडी, ढोणेवस्ती, तळेगाव दिघे येथील भागवतवाडी, मनोली, घुलेवाडी येथील श्रीराम कॉलनी, कनोली, शेडगाव, पिंपरणे येथील राहिंज वस्ती, निमगाव बुद्रुक गावठाण, निमगावजाळी, आश्वी खुर्द मातंग वस्ती, राजापूर, सायखिंडी नन्नवरे वस्ती व खळी वाडग, गुंजाळवाडी दोन कुटुंब वस्ती, वनकुटे, चिकणी वर्षे वस्ती, आश्वी बुद्रुक, खांडगाव, वडगावलांडगा, मांडवे बुद्रुक, चंदनापुरी, कोल्हेवाडी, चिंचपूर बुद्रुक, निमोण, मेंढवण, मालुंजे, पेमगिरी ही गावे १४ दिवस प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.