अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेत आलेल्या करोना लसीच्या डोसपैकी प्रत्येकी सरासरी 300 डोस हे शुक्रवारी तालुक्याच्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत.

यात नेवासा, श्रीगोंदा आणि नगर मनपा हद्दीतील केंद्र वगळण्यात आले आहेत. सर्वाधिक करोना लसीचा डोस हे अकोले तालुक्यात 500 असे पाठविण्यात आलेला आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या साखळी शित यंत्रणातून शित कंटेनरमधून प्रत्येक तालुक्याला 300 या प्रमाणे करोना लसीचा डोस हा तालुक्याच्या ठिकाणी पाठविण्यात आला. उद्या (शनिवार) पासून करोना लसीद्वारे प्रत्यक्षात आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी सरकारी आणि खासगी डॉक्टर यांचे लसीकरण सुरू होणार आहे.

जिल्ह्यात आधी 21 केेंद्रातून हे लसीकरण होणार होते. त्यात सात केंद्र कपात करण्यात आली. त्यानंतर काल पुन्हा तीन केंद्र कपात करण्यात आली आहेत. यात नेवासा, श्रीगोंदा आणि नगर शहरातील मनपा हद्दीतील एका केंद्राचा समावेश आहे.