अहमदनगर हादरले : व्यवसायिक कर्जातून एकाच 
कुटुंबातील तिघांनी संपविले जीवन

अहमदनगर हादरले : व्यवसायिक कर्जातून एकाच कुटुंबातील तिघांनी संपविले जीवन

केडगाव उपनगरातील घटना

अहमदनगर|Ahmedagar

राहत्या घरात पती-पत्नीसह अल्पवयीन मुलीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. केडगाव उपनगरातील अर्थवनगरमध्ये आज सकाळी ही घटना उघडकीस आली. संदीप दिनकर फाटक (वय- 42), किरण संदीप फाटक (वय- 32) व त्यांची मुलगी मैथाली संदीप फाटक (वय- 12) असे मयत तिघांचे नावे आहेत.

अहमदनगर हादरले : व्यवसायिक कर्जातून एकाच 
कुटुंबातील तिघांनी संपविले जीवन
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

घटनेची माहिती स्थानिकांनी कोतवाली पोलिसांना दिल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक सतिश शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे.

पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतले आहे. व्यवसायिक कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा त्यामध्ये उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. फाटक कुटुंबाचा किराणा मालाचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com