करोना अ‍ॅक्टिव्हची संख्या दीड हजारांच्या पुढे

करोना अ‍ॅक्टिव्हची संख्या दीड हजारांच्या पुढे

24 तासांत 280 रुग्ण वाढले : मृतांच्या आकडेवारीत एकने वाढ

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

गेल्या 24 तासांत नव्याने 280 करोना रुग्णांची भर जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीत पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 3 हजार 68 झाला असून यात उपचार घेणारे (अ‍ॅक्टिव्ह रुग्ण) 1 हजार 537 झाली आहे. यासह जिल्ह्यातील एकूण मृतांच्या आकडेवारीत एकाची भर पडल्याने मृतांचा आकडा 51 झाला आहे.

शनिवारी जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅबमध्ये 104, अँटीजेन चाचणीमध्ये 18 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 158 जण करोना बाधित आढळून आले. यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 537 इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या 3 हजार 68 इतकी झाली आहे.

काल दुपारी 12 वाजता आलेल्या अहवालात 70 ने वाढ झाली होती. यात संगमनेर तालुका 12, पारनेर तालुका 5, नेवासा तालुका 2, राहाता 11, राहुरी 7, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 3, नगर शहर 11, पाथर्डी 1, शेवगाव 1, भिंगार 10, कर्जत 2, अकोले तालुका 0, नांदेड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता आलेल्या अहवालात आणखी बाधित 34 रुग्णांची भर पडली. यामध्ये अकोले 4, पाथर्डी 2, नेवासा 1, नगर ग्रामीण 4, मिलिटरी हॉस्पिटल 2, कर्जत 1, श्रीरामपूर 11, कोपरगाव 3, मनपा 3, श्रीगोंदा 2, संगमनेर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 18 जण बाधित आढळले. त्यात, राहाता 2, पाथर्डी 11, कोपरगाव 1, भिंगार कॅन्टोन्मेंट 1 आणि मनपा येथील 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 158 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 104, अकोले 1,कर्जत 1, नगर ग्रामीण 16, नेवासा 5, पारनेर 5, पाथर्डी 2, राहाता 14, राहुरी 3, संगमनेर 3, श्रीगोंदा 3 आणि श्रीरामपूर 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Last updated

शनिवारी आणखी 44 रुग्णांनी करोनावर मात केली. यात अकोले 1, कर्जत 1, नगर ग्रामीण 2, नगर शहर 11, पारनेर 2, पाथर्डी 1, संगमनेर 10, राहाता 7, श्रीगोंदा 7, श्रीरामपूर 2 अशी रुग्णांची संख्या असून एकूण करोनावर मात केलेल्यांची संख्या आतापर्यंत 1 हजार 480 झाली आहे.

Last updated

Deshdoot
www.deshdoot.com