नेवासा (का. प्रतिनिधी) -

नेवासा तालुक्यातील माळेवाडी खालसा-म्हाळापूर-प्रवरासंगम या ग्रुप ग्रामपंचायतीच्या 13 जागांसाठी 27 उमेदवारी अर्ज शिल्लक

राहिले आहेत.

प्रभागनिहाय उमेदवार- प्रभाग 1- नामा प्रवर्ग-अशोक गजानन शिंदे व मुरलीधर ज्ञानदेव खेमनर. अनुसूचित जाती महिला- मनीषा प्रवीण मिसाळ व विमल सूर्यभान मिसाळ. प्रभाग 2- अनुसूचित जमाती व्यक्ती- सुरज साहेबराव पवार व अरुण शिवराम माळी. नामा प्रवर्ग स्त्री-राधा सुखदेव कुसळकर व सविता ज्ञानेश्वर देसाई.

सर्वसाधारण महिला-सोनाली सागर गाडेकर व रेणुका राजेंद्र म्हस्के. प्रभाग 3- सर्वसाधारण व्यक्ती- जिजाबाई कचरु कदम व अक्षय उल्हास मुळे. नामा प्रवर्ग महिला-भारती प्रकाश पांडव व अर्चना संदीप सुडके प्रभाग 4- नामा प्रवर्ग व्यक्ती- मनोहर शंकर कदम व लक्ष्मण नारायण जगधने.

सर्वसाधारण व्यक्ती-भिकन फकीरचंद कोठारी व गजानन सोपान गवारे. सर्वसधारण महिला- रोहिणी लक्ष्मण चव्हाण व उषा सोपान पटारे. प्रभाग 5- अनुसूचित जाती-अनिल बाबुराव गोरे, चंद्रकांत जयवंत गायकवाड, नितीन गोपीनाथ भालेराव व सोमनाथ विश्वनाथ साठे. अनुसूचित जाती महिला- आशाबाई दगडू गायकवाड, शांताबाई दिनकर पारखे व सविता राजू फाजगे.