नेवासा ( प्रतिनिधी)-

नेवासा तालुक्यात दोन दिवसात 25 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 2738 झाली आहे.

रविवारी तालुक्यातील 8 गावातून 10 संक्रमित तर सोमवारी 7 गावात 15 संक्रमित आढळून आले.

रविवारी नेवासा शहर व खामगाव येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले होते. तर गोगलगाव, रामडोह, मुकिंदपूर, पिचडगाव व भालगाव व बेलपिंपळगाव या 6 गावात प्रत्येकी एक संक्रमित आढळला होता.

सोमवारी नेवासा शहरात सर्वाधिक 5 करोना संक्रमित आढळून आले. त्याखालोखाल बेलपिंपळगाव येथे तिघे, महालक्ष्मी हिवरा व मुकिंदपूर येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

पाचेगाव, भानसहिवरा व बाभुळवेढा या तीन गावात प्रत्येकी एक संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे रविवारी व सोमवारी या दोन दिवसात नेवासा तालुक्यात नव्याने 25 संक्रमित आढळले असून त्यामुळे तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 2738 झाली आहे.