कांदा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक

कांदा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक

राहाता | तालुका प्रतिनिधी

राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा आडतदार व्यापारी महेश दत्तात्रर खर्डे यांची केरळ राज्यातील कोचीकोड येथील एम. व्ही. आर. ट्रेडर्सच्या मालकाने 24 लाख 49 हजार 280 रुपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी राहाता पोलिसात केरळ राज्यातील अशोक वेलुस्वामी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीतील भगवती ट्रेडर्सचे मालक महेश दत्तात्रर खर्डे (वर 34 वर्ष ) रा. कोल्हार यांनी राहाता पोलिसात फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे की, दि 1 मे 2012 ते दि. 22 मार्च 2021 या कालावधीत एम. व्ही. आर. ट्रेडर्स कोचिकोड (केरळ) चे मालक अशोक वेलुस्वामी यांना पाठविललय कांद्याचे एकूण 24 लाख 49 हजार 280 रुपरे ही रक्कम मला मिळाली नाही. त्यामुळे व्यापारात माझा मोठा तोटा झाला असून मी वेळोवेळी आरोपी अशोक वेलुस्वामी यास फोन करून कांद्याचे मालाचे बाकी असलेले पैसे मागितले असता, त्याने सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे.

एम. व्ही. आर. ट्रेडर्स कंपनीचे मालक अशोक वेलुस्वामी यांनी माझा विश्‍वास संपादन करून माझी फसवणूक केली आहे. अशी फिर्याद राहाता पोलिसात खर्डे यांनी दिली आहे. त्यावरून राहाता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 498/2022 भादवी कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com