नेवासा कारागृहातील 21 आरोपींसह 5 पोलीस कर्मचारी करोना संक्रमित
सार्वमत

नेवासा कारागृहातील 21 आरोपींसह 5 पोलीस कर्मचारी करोना संक्रमित

तालुका पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे

Nilesh Jadhav

नेवासा |तालुका प्रतिनिधी | Newasa

नेवासा येथील पोलीस ठाण्याच्या दुय्यम कारागृहातील 21 आरोपींसह लॉकअप गार्डवरील 5 पोलीस कर्मचार्‍यांचा अहवाल करोना संक्रमित आला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

नेवासा कारागृहात रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. काल गुरुवारी कारागृहातील एकूण 47 आरोपी पैकी 21 जण करोना संक्रमित आढळले तर 5 पोलीस कर्मचारी देखील करोना संक्रमित असल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

त्यातील एका संक्रमिताची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे. नेवासा तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याचा परिसर सील करण्यात येवून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.

माहिती देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

सदरील करोना संक्रमित रुग्णांची माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली. विविध भागात करोना संक्रमित रुग्ण आढळत असताना माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com