नगर - जिल्ह्यात आज आढळले २२ करोनाबधित

उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १९२५
नगर - जिल्ह्यात आज आढळले २२ करोनाबधित

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९२५ इतकी झाली आहे.

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले. या बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये धुळे जिल्हा - ०१, मनपा - तारकपूर नगर ०१, कल्याण रोड ०१, गुगळे कॉलनी ०१, नगर शहर २, कॅन्टोन्मेंट ०२, पारनेर - रुई छत्रपती ०१, पारनेर १३ रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com