नवोदय विद्यालयातील शिक्षकासह २० विद्यार्थी करोनाबाधित

संगमनेर, पारनेर, श्रीरामपूर नगरमधील विद्यार्थ्यांचा समावेश
नवोदय विद्यालयातील शिक्षकासह २० विद्यार्थी करोनाबाधित
करोनाबाधित

पारनेर (प्रतिनिधी)

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १९ आणि एक संगीत शिक्षक करोनाबाधित आढळले आहेत.

यामध्ये पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, नगर येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इयत्ता दहावी व बारावीचे अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी नवोदय विद्यालयामध्ये बाहेरून आले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून बाधा झाली असण्याची शक्यता नवोदय विद्यालयाच्या प्रशासन व पारनेर आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

करोनाबाधित
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

दरम्यान, विद्यालयातील नवोदय ९ विद्यार्थ्यांना गुरुवारी करोना सदृश आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांची तपासणी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. यात विद्यालयातील विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आल्याने उर्वरित विद्यार्थी तपासणी शुक्रवारी सकाळी केली असता १० विद्यार्थ्यांना करोना बाधित व एका संगीत शिक्षकाला गुरुवारी बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे या १९ जणांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोविड सेंटरमध्ये आरोग्य विभागाने उपचारासाठी दाखल केले आहेत.

या घटनेची माहिती समजताच तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे, डॉ. अन्विता भांगे, डॉ. स्वाती ठुबे या आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने ४१० जणांचे नमुने घेण्यास सुरुवात केली असून यापैकी २०० जणांचे नमुने तपासून झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील दोन दिवसांत १९ करोना बाधित आढळून आल्याने विद्यार्थी व पालकांचे तसेच शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

करोनाबाधित
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण...

यामुळे विद्यार्थ्यांना तपासणीसाठी व उपचारासाठी दाखल करण्यासाठी पालकांनी विद्यालयात एकच गर्दी केली आहे. या विद्यालयातील विद्यार्थी संख्या ४१० च्या आसपास असून या विद्यालयात जवळपास ७० ते ८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचीही तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असल्याची माहिती तहसीलदार शिवकुमार आवळकंठे व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली आहे.

करोनाबाधित
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

विद्यालय सात दिवस बंद - तहसीलदार आवळकंठे

टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात दोन दिवसाच्या कालावधीत जवळपास १९ करोना बाधित विद्यार्थी व एक शिक्षक आढळून आले असून जवळपास ४५० जणांचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे नवोदय विद्यार्थी वर्ग सात दिवस बंद ठेवणार असून इतर शैक्षणिक अॅक्टिव्हिटी मात्र सुरू राहणार असल्याचेही तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्या कुटुंबियांची पण तपासणी करणार असल्याचे तहसीलदार आवळकंठे यांनी सांगितले.

पालक धास्तावले

टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात राज्यभरातून ४०६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात संगमनेर, पारनेर, श्रीरामपूर, नगरमधील काही विद्यार्थी करोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील राहूरी, नेवासा तसेच अन्य तालुक्यांतील अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. अनेकजण करोनाबाधित झाल्याने विद्यार्थी आणि पालक धास्तावले आहेत.

करोनाबाधित
'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com