करोना बाधितांचा आकडा 646

सोमवारी नव्याने 20 बाधित तर आठ खासगी अहवालांची जिल्ह्याच्या आकडेवारीत भर
Corona
Corona

अहमदनगर। प्रतिनिधी। Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्गाचा कहर थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सोमवारी पुन्हा नगर शहरात करोनाचे 13 रुग्ण तर उर्वरित जिल्ह्यातील रुग्ण मिळून 20 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. यासह खासगी प्रयोग शाळेत पॉझिटिव्ह आलेल्या मात्र सरकारी आकडेवारीत समावेश नसलेल्या आठ रुग्णांची भर जिल्ह्याच्या करोनाच्या कालच्या आकडेवारीत पडली आहे. यामुळे जिल्ह्याचा करोना बाधितांचा आकडा 646 पर्यंत पोहचला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना चाचणी प्रयोग शाळेतून काल दुपारी चार वाजता आलेल्या अहवालात करोनाचे नव्याने 20 रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये नगर शहर 13, कर्जत तालुका 2, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगार एका रुग्णांचा यात समावेश होता. नगर शहरातील भराडगल्ली येथे 6, तोफखाना 4, शास्त्रीनगर 1, सातभाई मळा 1 आणि गंज बाजार येथे एक व्यक्ती बाधित आढळून आला.

गवळीवाडा (भिंगार) 1, राहुरी तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे 1, रानेगाव (ता. शेवगाव) 1, जामखेड येथे एक रुग्ण आढळून आला. कर्जत तालुक्यातील माहीजळगाव आणि पाटेगाव येथे प्रत्येकी एक आणि पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे एक रुग्ण आढळून आला आहे.

यासह खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आठ रुग्णांमध्ये राहाता, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर मधील प्रत्येकी एक आणि नगर महानगरपालिका क्षेत्रातील 5 रुग्णांचा समावेश आहे.आयसीएमआर पोर्टलवर या रुग्णांची नोंद झाल्यानंतर या आठ रुग्णांचा जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येत समावेश करण्यात आला. जिल्ह्यात काल दिवसभरात 113 व्यक्तींचे करोना अहवाल निगेटिव्ह आले होते. जिल्ह्यात सध्या करोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 210 असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 419, मृत्यूू 17 आणि एकूण रुग्ण संख्या 646 झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी 18 रुग्णांनी करोनावर मात केली. यात, नगर मनपा 10, संगमनेर 4, राहाता 3 आणि नगर ग्रामीण मधील एका रुग्णाचा समावेश. यासह पुण्यात उपचार घेऊन बरा झालेल्या एका रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. यामुळे करोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 419 झाली असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील नोडल अधिकारी यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com