२ लाख ७० हजारांचा गांजा जप्त

राजूर पोलिसांची कामगिरी
२ लाख ७० हजारांचा गांजा जप्त

अकोले | प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाणे हद्दीतील वारंघुशी गावातील कळम देवीवाडी येथील डोंगर दरीत काही शेतकऱ्यांनी गांज्याची शेती केल्याची माहिती राजूर पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व राजूर पोलीस स्टेशन चे सा. पो. नि नरेंद्र साबळे व त्यांच्या पथकाने रस्ता नसल्याने पायी जाऊन या गांज्याच्या शेतीचा छडा लावला. सलग दोन दिवस कारवाई करून पोलिसांनी तब्बल २ लाख ७० हजार रुपये किमतीचे २७० किलो गांज्याची ओली झाडे उपटून ताब्यात घेतली. याप्रकरणी चार जणांवर एनडीपीसीएस अॅक्ट १९८५ चे कायदा कलम २०/२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की. वारंघुशी येथील कळम देवीच्या डोंगर दरीत मनोहर माधव घाणे, गोपाळा नामदेव लोटे, धोंडीराम चिंधू घाणे, चंदर देवराम लोटे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत गांज्याच्या झाडाची लागवड केली होती. याबाबतची माहिती राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना खबऱ्या मार्फत मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. जिल्हा अधिक्षक मनोज पाटिल, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, सहाय्यक पो. नि. नरेंद्र साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार, पो. ना. दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, विजय फटांगरे, साईनाथ वर्षे, ढाकणे यांच्या पथकाने काल गुरूवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली.

सदर घटनास्थळी वाहनाने जाणे शक्य नसल्याने या पथकाने सुमारे ३ किलोमिटर डोंगर दरीत पायी जात कारवाई सुरू केली. यावेळी या शेतात इतर पिकांबरोबर गांज्याची झाडे बहरलेली आढळून आली. गुरूवारी उशिर झाल्याने व अंधार पडल्याने या पथकाने ४ किलो ६०० ग्रॅम झाडे तोडून ताब्यात घेतली. काल शुक्रवारी पुन्हा सकाळी या पथकाने घटनास्थळी जाऊन उर्वरीत कारवाई केली. या कारवाईत एकूण तब्बल २७० किलो हिरवीगार गांज्याची झाडे (२ लाख ७० हजार रुपये किंमत) ताब्यात घेतली तसेच वरील चार जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजूर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Related Stories

No stories found.