Corona
Corona
सार्वमत

नगर - जिल्ह्यात आज आढळले १९ करोना बाधित

जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४४१ झाली असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर (प्रतिनिधी) - आज जिल्ह्यात १९ जण करोना बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४४१ झाली असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ०३, नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बाग रोझा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, सिध्दार्थ नगर येथील ३८ वर्षीय पुरुष, माधवनगर कल्याण रोड येथील ४० वर्षीय महिला बाधित आढळून आली. भिंगार येथील ३५ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय आणि ३८ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. याशिवाय आलमगीर (भिंगार) येथील ३० वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, पारनेर तालुक्यातील बाभूळ वाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, जामखेड तालुक्यातील जायभाय वाडी येथील ३२ वर्षीय व्यक्ती ( कल्याण वरून प्रवास करून आलेला) आणि शेवगाव तालुक्यातील आठेगाव येथील ३० वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com