कोपरगावात 18 करोना पॉझिटिव्ह
सार्वमत

कोपरगावात 18 करोना पॉझिटिव्ह

आज 101 व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

शहरातील काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 101 व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये 18 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.

कोपरगाव शहरात काल दि 1 ऑगस्ट रोजी 11 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले होते. त्यांच्या संपर्कातील 101 व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये 18 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

टिळेकर वस्ती येथील 60 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, संजीवनी येथील 18 व 27 वर्षीय पुरुष, संजय नगर येथील 88 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरुष, बैल बाजार रोड येथील 66 व 36 वर्षीय पुरुष तर 46 व 27 वर्षीय महिला, सुभाष नगर येथील 18 वर्षीय पुरुष, महादेवनगर येथील 63 वर्षीय पुरुष, शंकर नगर येथील 38 वर्षीय पुरुष, टिळकनगर येथील 50 वर्षीय महिला, तर तालुक्यातील धारणगाव येथील 45 वर्षीय पुरुष तर मंजूर येथील 13 वर्षीय मुलगा तर 32 व 30 वर्षीय महिलांचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यात 2 ऑगस्ट रोजी 136 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 90 रुग्ण उपचार घेत आहेत. एक महिला मयत तर 45 रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com