राजकीय कार्यकर्त्याच्या कुटुंबासह तालुक्यात आढळले 14 रुग्ण
सार्वमत

राजकीय कार्यकर्त्याच्या कुटुंबासह तालुक्यात आढळले 14 रुग्ण

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

एका राजकीय कार्यकर्त्याच्या कुटुंबासह तालुक्यात काल 14 रुग्ण आढळून आले मात्र त्याच वेळेला बधितांच्या संपर्कातील तसेच अन्य संशयित अशा 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अकोले तालुक्यातील एकुण रुग्णांची संख्या 166 झाली आहे.

तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्याबरोबर शहरातही रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र तरी नागरीक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाही व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. दैनंदिन भरणार्‍या गुजरीला आठवडे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दुसरीकडे प्रशासनही अधिक कडक स्वरूपाची पावले उचलतांना दिसत नाही. ठराविक ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येतो मात्र सुरूवातीला केले जणारे बफर झोन सध्या कुठेही दिसत नाही तसेच महात्मा फुले चौक वगळता कुठेही विना मास्क व इतर दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही.

दरम्यान काल मंगळवारी अकोले शहराला हादरा देणारी घटना घडली आहे. शहरातील एक सामाजिक बांधिलकी ठेऊन काम करणारा, सामाजिक संघटनेचा एका 36 पदाधिकार्‍याचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल सकाळी प्रशासनास प्राप्त झाला. त्या पाठोपाठ लगेचच दुपारी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात त्या सामाजिक कार्यकर्त्याचे वडील, आई, भाऊ, पत्नी व लहान मुलीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.तालुक्यातील उंचखडक येेेेथील 47 वर्षीय महिला तसेच 6 वर्षीय बालक, सुगाव खुर्द येथील 27 वर्षीय तरुण, शेेरणखेल येेेेथिल 50 वर्षीय पुरुष, तर बांगरवाडी येेेेथील 25 वर्षीय व 19 वर्षीय तरुनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील 36 वर्षीय कार्यकर्ता, शाहुनगर येथिल 78 वर्षिय पुुुुरुष, तालुक्यातील मोग्रस येथील 60 वर्षिय पुुुरुष अशा एकुण 14 व्यक्तींचा करोना अहवाल पॅॅाझिटीव्ह आला आहे.

तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या हळूहळू द्वि शतकाच्या दिशेने सुरु असुन तालुक्याची एकुण रुग्णसंख्या 166 झाली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 107 व्यक्ती करोना मुक्त झाले असून तीन जण मयत झाले आहे तर 56 व्यक्तींवर सध्या उपचार सुरु आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव तालुक्यासह शहरातही वाढत असुन नागरिकांनी घाबरून जावु नये फक्त प्रशासनाला सहकार्य करा, काळजी घ्या मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. विनाकारण शहरात, बाहेर फिरू नका, घरात रहा सुरक्षित रहा असे आवाहन प्रशासनाच्या वतिने करण्यात आले आहे.

अकोले शहर व तालुक्यातील बाधितांच्या संपर्कातील काल 90 व्यक्तीचे स्वॅब सोमवारी तपासणीसाठी अहमदनगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्यापैकी 85 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असुन त्यात 11 व्यक्ती पॅाझिटीव्ह तर 74 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेतील तिन अहवाल पॅाझिटीव्ह आले आहेत. 05 अहवाल प्रतिक्षेत आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी व बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींनी तात्काळ तपासणी करावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com