corona
corona
सार्वमत

जिल्ह्यात आज दुपारी आढळले १८ बाधित रुग्ण

नगर महापालिका क्षेत्रातील ०६, भिंगार ०७, संगमनेर ०१, शेवगाव ०१, पारनेर ०२ आणि राहाता येथील ०१ रुग्ण बाधित आढळून आले.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये दुपारी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील ०६, भिंगार ०७, संगमनेर ०१, शेवगाव ०१, पारनेर ०२ आणि राहाता येथील ०१ रुग्ण बाधित आढळून आले.

नगर महापालिका क्षेत्रात पद्मा नगर येथे ०३, टीवी सेंटर ०१, फकिरवाडा ०१. पाइपलाइन रोड ०१ रुग्ण आढळून आला. भिंगार मधील गवळी वाडा येथे ०७ रुग्ण आढळून आले. संगमनेर तालुक्यात संगमनेर खुर्द येथे एक रुग्ण आढळून आला. पारनेर तालुक्यातील पारनेर शहर आणि भाळवणी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथे तर राहाता तालुक्यात पाथरे येथे बाधित रुग्ण आढळला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com