१६ रुग्णांची कोरोनावर मात
सार्वमत

१६ रुग्णांची कोरोनावर मात

८० वर्षांचे वृध्द, २ वर्षांच्या चिमुकलीचा समावेश

Anant Patil

अहमदनगर ( प्रतिनिधी ) - नगर शहर १३ आणि संगमनेर, जामखेड, अकोले तालुका प्रत्येकी एका रुग्ण असे १६ रुग्णांनी आज करोनावर मात केली. जिल्ह्यात एकूण करोनामुक्त रुग्ण संख्या आता ३०७ झाली असून उपचार घेत असलेले सक्रीय रुग्णांची संख्या ही १०१ इतकी झाली आहे.

दरम्यान, आज सकाळी ५५ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com