अकोल्यात करोना बाधितांनी शंभरी ओलांडली
सार्वमत

अकोल्यात करोना बाधितांनी शंभरी ओलांडली

आतापर्यंत ६६ रुग्ण करोना मुक्त

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले तालुक्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आज बुधवारी सकाळी एकाच वेळी तब्बल १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील माणिक ओझर येथे तब्बल १० तर राजुरला दोन, वाघापुर एक व निंब्रळ एक अशा १४ जणांचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात सकाळीच तालुक्यातील माणिक ओझर येथील ४२, ३४, ३३ व २२ वर्षीय पुरुष ६०,४८ व ३७ वर्षीय महिला व १४, ०५ व ०१ वर्षीय लहान मुले तर तर राजुर येथील ६० व ३० वर्षीय पुरुष, वाघापुर येथील ४५ पुरुष व निंब्रळ येथील २१ वर्षीय तरुणाचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यात रुग्णांची एकुण संंख्या ११० झाली आहे. त्यापैकी ६६ जण करोनामुक्त झाले आहेत. ३ जण मयत झाले असून सध्या ४१ जणांवर उपचार सुरु आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांनी दिली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com