नेवासामध्ये करोनाचा कहर !
सार्वमत

नेवासामध्ये करोनाचा कहर !

तालुक्यात आजपर्यंत १४ व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू

Nilesh Jadhav

नेवासा । शहर प्रतिनिधी । Newasa

शहरासह तालुक्यात आज ३२ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली. तालुक्यातील रुग्ण संख्या ५३९ वर गेली आहे.

नेवासा येथील कोविड केअर सेंटर (covid care center) मध्ये १२९ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट (rapid antigen test) करण्यात आल्या यामध्ये १६ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून नेवासा खुर्द २, शिरेगाव ३, कुकाना ४, खुपटी ४, शिंगवे तुकाई १, गिडेगाव ६, भेंडा बुद्रुक २, नेवासा बुद्रुक ३, खडका १, घोगरगाव २, या गावातील व्यक्तींचा समावेश आहे. तर खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात कुकाणा येथील ३ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात सोनई येथील १ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

शुक्रवार तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ५७१ झाली आहे. २४ व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने ४४८ कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आजपर्यंत १४ व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com