राहुरी तालुक्यात एकाच दिवसात 16 जणांना करोना
सार्वमत

राहुरी तालुक्यात एकाच दिवसात 16 जणांना करोना

तांभेरेत चाचणीत 13 जण बाधीत; रूग्णसंख्या 113 वर

Nilesh Jadhav

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे काल 100 जणांच्या अ‍ॅन्टीजेन चाचणीत तब्बल 13 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. तर वांबोरीत दोन पुरूष, मुसळवाडीत एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राहुरी तालुक्यात काल दिवसभरात तब्बल 16 जण बाधित झाले आहेत.

त्यामुळे आता राहुरी तालुक्यात करोनाबाधितांच्या रुग्णांनी शतक ओलांडून ही संख्या 113 वर जाऊन पोहोचली आहे. राहुरी तालुक्यात करोना संक्रमणाचा धोका वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी तांभेरे येथील एका 43 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काल तांभेरे येथे 100 जणांची अ‍ॅन्टीजेन चाचणी घेण्यात आली. त्यात 13 जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या बाधितांना राहुरी विद्यापीठातील कोव्हिड सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित 87 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

सध्या राहुरी तालुक्यातील बाधितांची संख्या 113 झाली आहे. कोविड सेंटरमध्ये 33 जणांवर उपचार सुरू असून विद्यापीठात 20 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com