Corona
Corona
सार्वमत

नगर - दिवसभरात 25 करोनाबाधित

शहरातील आडते बाजार ५ पाईपलाईन रोड १,तोफखाना ५, ढवण वस्ती १ यांचा समावेश आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर (प्रतिनिधी) - रविवारी दिवसभरात एकूण 25 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत.

संध्याकाळी आलेल्या अहवालात १३ जण करोना बाधित आढळून आले आहे. या मध्ये भिंगार येथील तर नगर शहरातील आडते बाजार ५ पाईपलाईन रोड १,तोफखाना ५, ढवण वस्ती १ यांचा समावेश आहे. तसेच ७० व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

सकाळी आलेल्या अहवालांमध्ये 12 करोना बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 06, नगर शहरात 04 तर अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

Deshdoot
www.deshdoot.com